ब्रेकिंग ... चिकलठाणा एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

Foto

 औरंगाबाद: चिकलठाणा एमआयडीसी येथील एका कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली.  या आगीमध्ये कंपनीतील साहित्य जळून खाक झाले आहे.  अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत आहे. 

एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील एका कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली.  या आगीमध्ये कंपनी अनेक साहित्य जळून खाक झाले आहे.  काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या बाबांना पाचारण करण्यात आले आहे.  अग्निशमन दलाच्या जवानांना कडून आग विझविण्याचे काम सुरू असून आतापर्यंत दोन बंबाच्या सहाय्याने मदत कार्य सुरू आहे